प्रेस मीडिया लाईव्ह :
मायणी : येथे शनिवार दिनांक १८.०१.२०२५ रोजी वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशाला मायणी येथे भव्य-दिव्य असा मुलींचा कलाउत्सव २०२५"जागर स्त्री कलेचा"कार्येक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला
या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक सचिव मा.श्री.एस्.डी.कुबेर सर यांचेहस्ते करण्यात आले,तर दिप प्रज्वलन संस्थेचे विद्यमान चेअरमन मा.श्री.सुरेंद्र (दादा) गुदगे यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मा.सौ.शोभनाताई गुदगे,संस्थेचे विद्यमान संचालक मा.श्री. ए.टी.पुस्तके.सर,श्री.एन्.व्ही.कुबेर.सर,श्री.डी.आर.पिटके सर यांच्या उपस्थितीत संपन्न झालं
.....या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला,कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.येवले व्ही व्ही. व आभार पर्यवेक्षक श्री.एस्.आर.बागडे सर यांनी मानले,सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,त्याच बरोबर मायणी ग्रामपंचायत सरपंच सौ.सोनाली माने,उपसरपंच श्री.डी.एस्.कचरे.सर, सर्व ग्रामपंचायत सदस्य,यशवंत विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री.अनिल माळी,सर्व सदस्य,विविध संघटनांचे पदाधिकारी यांची उपस्थितीत संपन्न झाला.....कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेतील माझी विद्यार्थिनी कु.विद्या गोसावीने प्रशालेस वाॅटरप्युरिफायर भेट दिले.....म्हणून त्यांच्या मातोश्री श्रीमती जगुबाई कृष्णा गोसावी यांचा यथोचित सत्कार संस्थेचे विद्यमान चेअरमन मा.श्री.सुरेंद्र(दादा) गुदगे यांच्या हस्ते करण्यात आला....
सत्कार समारंभ झाले नंतर कला उत्सव 2025 जागर स्त्री कलेचा या कार्यक्रमाची सुरुवात श्रीगणेशाच्या आराधनेने करण्यात आली.या कलाउत्सव समारंभामध्ये इयत्ता पाचवी ते दहावी च्या विद्यार्थीनीं सहभागी होऊन अनेक प्रकारची अभिनय गीते सादर करण्यात आली असून त्यामध्ये मराठी मोळी लावणी नृत्य,कोळी नृत्य,लोक भारूड अभिनय गीत त्याच प्रमाणे भारतीय जवान सीमा सुरक्षा संरक्षण कशाप्रकारे करतात या प्रकारे सुंदर अभिनय गीते विद्यार्थींनींनी सादर केली.अशा प्रकारे वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशाला मायणी च्या विद्यार्थीनीं कलाउत्सव 2025 जागर स्त्री कलेचा या कार्यक्रमासाठी उपस्थित माता पालक वर्ग त्याच प्रमाणे परिसरातील प्रेक्षकवर्ग यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला...