प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगडचे जिल्हाभरात काम अतिशय उल्लेखनीय असून .सदर विभागाने गेल्या वर्षापर्यंत आणि याही वर्षात घडलेल्या चोऱ्या, घर फोड्या, चैन स्नॅचिंग मधील इराणी आरोपी तसेच एम. पी., यु.पी. व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून आरोपी पकडून आणण्यात त्यांना यश मिळाले आहे. आतापर्यंत घडलेले सर्वच खून सदरातील गुन्हे एनडीपीएस अंतर्गत येणारे गुन्हे तसेच अवैध शस्त्र यांची वाहतूक करताना पकडण्यात आलेली गुन्हेगार व निवडणुकीच्या काळात केलेल्या प्रतिबंधक कारवाया व बोगस कारखाने यांची वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी गोष्टी व गुन्हे उघडकीस आणून वाहवा मिळवलेली आहे.
आजतागायत केलेल्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल शासनस्तरावर वरिष्ठांकडून व वृत्तसंस्थाकडून वेळोवेळी दखल घेऊन अभिनंदन करण्यात आले आहे. यामुळे अधिकारी कर्मचारी यांचे विभागाचे काम करण्याची ऊर्जा प्रचंड वाढली आहे.
परंतु त्यामुळे गुन्हेगारांचे संबंध किंवा अवैध धंद्यांच्या संबंधात असलेले काही लोक जाणून-बुजून स्थानिक गुन्हे शाखेला टारगेट करत असून त्यांची प्रतिमा कशी मलीन होईल आणि त्यांना जनमानसात मिळणारा विश्वास व मानसन्मान, तसेच वरिष्ठांकडून मिळणारी कौतुकाची वागणूक कशी कमी होईल आणि त्यांच्या मर्जीतील लोक वरिष्ठांच्या आजूबाजूला ठेवून आपली मक्तेदारी कशी ठेवता येईल या प्रयत्नात असल्याचे जाणवत आहे. त्याअनुषंगाने विशिष्ट लोकांना इलेक्ट्रॉनिक मीडियाचा गैरवापर करून त्यांच्या फोटोसहीत नावाने प्रसिद्ध करीत आहेत.
तरी भविष्यात गुन्हेगारीला आळा घालण्याचे कामाला यामुळे खिळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विपरीत कार्य व अपप्रचार होत असल्याने संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचारी यांचे मनोबल कमी होऊ शकते. आपण सर्व सहकारी तसेच पोलीस दलाच्या पाठीशी असणाऱ्या सर्व हितचिंतकांना नम्र विनंती आहे की कोणीही अशा घटना किंवा गोष्टी, तसेच विभागातील अधिकारी- कर्मचारी यांची प्रतिमा मलीन होईल असे कोणतेही आक्षेपार्ह संदेश कोणतीही पुष्टी तथा खातरजमा केल्याविना प्रसारित करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.