प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
२६ जानेवारी २०२५ दुर्ग श्री सोंडाई
कर्जत खलापूरला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याचे अनेक पुरावे आज या परिसरात पहायला मिळतात. या इतिहासाची साक्ष परिसरातील अनेक लहान मोठे गडदुर्ग देत असतात. त्यातीलच चौक आणि कर्जत या वाटेवर आई सोंडाई मातेच्या नावाने ओळखला जाणार दुर्ग म्हणजे दुर्ग श्री सोंडाई. चौक वरून कर्जत ला जात असताना बोरगाव पासून सहज नजरेत पडणारा दुर्ग श्री सोंडाई गेली कित्त्येक वर्ष संवर्धनाच्या प्रतीक्षेत होता आणि हाच विडा उचलला श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान या संस्थेने.परिवाराकडून तब्बल १२ यशस्वी मोहिमा राबवण्यात आल्या या मोहिमांमध्ये दुर्गावरती अनेक कामे करण्यात आली
उदा. दुर्गावरील मातीखाली जात चाललेल्या सर्वच पाण्याच्या टाक्यांमधील गाल माती काढून त्यांना मोकळे केले, वृक्ष लागवड, मंदिराची साफ सफाई, गंजत चाललेल्या शिड्यांना पॉलिश करून कलर करण्यात आले, दुर्गा वरती येणाऱ्या भटक्यांसाठी सूचना माहिती फलक लावण्यात आले. तसेच दुर्गा वरती कायम स्वरुपी ३० फूट उंच भक्कम असा ध्वज स्तंभ लावण्यात आला.ध्वज स्तंभ लाऊन परम पवित्र भगवा ध्वज फडकाऊन भंडारा उधळून आनंद साजरा करण्यात आला.
दुर्ग सोंडाई वरती केलेल्या या सर्व कार्याचे स्थानिक लोकांकडून भरभरून कौतुक केले जात आहे.या पुढे देखील परिवारा कडून आपला ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या जाणार आहेत🙏🏻
आपलाच,
*श्रीमद्रायगिरौ प्रतिष्ठान*
*॥आमचं ईमान सदैव शिव-शंभूंच्या चरणी॥*