प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात खोपोली येथे अरुणा बार शेजारी खुलेआम खोपोली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत खुलेआम मटका चिमणी पाखरं, बेकायदेशीर अवैध धंदे जोमात सुरू आहेत
या अवैध धंद्यांमुळे कायदा सुव्यवस्था टिकून राहिल का? असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात असून हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद होणे गरजेचे आहे. या जुगाराच्या प्रकारांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. परिणामी मानवी हक्काचे उल्लंघन होत आहे.
तरी मा. मुख्यमंत्री, मा. गृहमंत्री, मा. पोलिस महासंचालक, मा. पोलीस महानिरीक्षक, मा. पोलीस अधिक्षक यांनी तातडीने या अवैध धंद्यांवर कारवाई करून बेकायदेशीर मटका बंद करावेत ही नम्र विनंती