डॉ. मुनीर तांबोळी यांच्या वाढदिवसाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी, शुभेच्छांचा वर्षाव

 


प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

पत्रकार आणि समाजसेवक म्हणून प्रसिद्ध असलेले मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या खास प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.केक कापून डॉ. तांबोळी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी लोकमुद्रा जनहित पार्टीचे पक्षाध्यक्ष कांतीलाल कडू, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शाकीर पटेल, वडघर ग्रामपंचायत प्रशासक मुकेश कांबळे, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, मुद्दसिर पटेल, ओवळे ग्रामपंचायतीचे सदस्य राज सदावर्ते, सूरज म्हात्रे, मंगल भरवाड ,स्वप्नील म्हात्रे, मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव गुरदीप सिंह, रिटघरचे माजी सरपंच भारत भोपी, सूरज नागे, फैसल तूपके,योगेश पगडे, सुधीर सोमवंशी, किरण करावकर, हरेश पाटील, यांच्या सह राजकीय, सामाजिक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

डॉ. मुनीर तांबोळी यांच्या सामाजिक कार्याची आणि पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती ही डॉ. तांबोळी यांच्या व्यापक जनसंपर्काचे आणि लोकप्रियतेचे द्योतक ठरली.डॉ. तांबोळी यांनी सर्वांचे आभार मानले आणि समाजहितासाठी अविरत कार्य करत राहण्याचे वचन दिले. त्यांनी आपल्या कार्यातून समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने हा सोहळा अविस्मरणीय ठरला आणि डॉ. तांबोळी यांच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित झाला. ही घटना त्यांच्या समाजकार्याला मिळालेली एक पोचपावतीच म्हणावी लागेल.

Post a Comment

Previous Post Next Post