प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
बनावट कागदपत्रे बनवत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या कोकणात जमीन विक्री, जमीन देणे घेणेचे व्यवहार मोठया प्रमाणात होत आहेत. मात्र या जमीन विक्री प्रकरणात अनेक उद्योजक, शेतकरी, जमीन मालक, व्यावसायिक यांची मोठया प्रमाणात आर्थिक फसवणूक होत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. अशीच जमीन विक्री व्यवहारात ठाणे येथील एका व्यावसायिकाची कोट्यावधी रुपयाची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की दिलीपकुमार फुलचंद जैन व्यवसाय (कंस्ट्रक्शन) त्यांचे सन २००५ पासुन योगी रिएलीटी प्रायव्हेट लिमीटेड नावाची फर्म असुन त्यामध्ये दिलीपकुमार हे स्वतः सीईओ असुन त्यांचा मुलगा मित व अनिल, केसरी जैन,प्रणय रविंद्र फाटक असे चारजण संचालक आहेत. नमुद योगी रिएलीटी प्रायव्हेट लिमीटेड मधुन इंडस्ट्रीयल पार्क डेव्हलपमेंट करण्याचे काम केले जाते.जानेवारी २००६ मध्ये गाव पिंपळास, ता. भिवंडी, जिल्हा ठाणे येथे ३०० एकर जमिन खरेदी करावयाचे असल्याने दिलीपकुमार यांच्या परिचयाचे दलाल नितीन शहा यांना त्याबाबत सांगितले. नितीन शहा यांचे परिचयाचे आशिष चंद्रकांत शहा, यांनी पिंपळास व गोवे परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांचे कुलमुखत्यापत्र व साठेकरार केलेले आहे. पुढील व्यवहार तोच करुन देणार असल्याचे सांगुन नितीन शहा यांनी दिलीपकुमार यांची आशिष शहा यांचे बरोबर भेट करुन दिली.सदर वेळी आशिष शहा यांना दिलीपकुमार यांनी सांगितले की, पिंपळास परिसरात २२७ एकर जागा एकत्रीत खरेदी करावयाचे आहे त्यावेळी आशिष शहा यांनी तुम्हाला
8 लाख प्रती एकर प्रमाणे
२२७ एकर जागा 18 करोड रुपयात एकत्रीत खरेदी करुन त्याचा ७/१२ नावावर करुन ताबा देतो असे सांगीतले होते.
दिलीपकुमार यांनी त्यांच्या सोबत समजोता करार केला त्यामध्ये आशिष शहा यांनी एकुण २२७ एकर जमिन खरेदी करुन देतो असे सांगितले, त्यासाठी आशिष शहा यांना बयाना रक्कम म्हणुन 50 लाख रुपयाचे दोन चेक मिळून 1 करोड दिले. आशिष शहा यांनी सांगितले की तुम्हाला आणखीन १०० एकर जमिन पाहिजे ती माझेकडे आहे तर तुम्ही रुपये 8 लाख एकरी प्रमाणे खरेदी करीत आहात त्या ऐवजी 13 लाख दराने पुर्ण ३०० एकर जमिन त्यामध्ये पिंपळास येथील २२७ एकर व गोवे येथील ७३ एकर जागा एकत्रीत रीत्या तुम्हाला देतो.योगी रियालटीज प्रा. ली. व आशिष शहा यांचेमध्ये २२७ एकर जमिनीचे व्यवहारा बाबत एमओयु (करार) करण्यात आला व उर्वरीत ७३ एकर जमिनीचा मौखीक करार आशिष शहा व नितीन शहा यांचे उपस्थितीत दिलीपकुमार यांच्या भिवंडी येथील कार्यालयात करण्यात आला होता.
पिंपळास येथील १४८ एकर जमिनीचे रजीस्ट्रेशन झालेले आहे त्यापैकी ठरलेल्या व्यवहारानुसार आशिष शहा यांनी मागणी केलेल्या रक्कमेनुसार चौदा कोटी छप्पन्न लाख रुपये चेक द्वारे आशिष शहा यांच्या वैयक्तीक खात्यावर जमा झाले आहेत.पिंपळास येथील १४८ एकर जमिनीपैकी ३७.६० एकर जमिन ही योगी रियालटीज प्रा.ली. चे नावे सात बाऱ्यावर झालेली आहे. उर्वरीत १७.९५ एकर जमिन ही हक्कनोंद फेरफारी साठी तलाठी सजा पिंपळास यांचेकडे प्रस्तावीत आहे. ९१.९८ एकर जमिनीचा साठेकरार झालेला आहे.सदर प्रमाणे चेक द्वारे देण्यात आलेल्या रक्कमे व्यतीरीक्त अशिष शहा याला बासष्ट कोटी रुपये नितीन शहा यांच्या हस्ते रोखीने देण्यात आले आहेत.सदर रक्कम दिल्यानंतर अशिष शहा यांनी अदयाप पर्यंत अर्ध्या पेक्षा जास्त जमिनीचा ताबा दिलीपकुमार यांना दिलेला नाही. म्हणुन दिलीपकुमार यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता शेतकऱ्यांनी सांगितले की, आम्हाला जमिनीच्या व्यवहारापोटी कोणतीही रक्कम मिळाली नाही व कोणतीही पॉवर ऑफ एटर्नी आशिष शहा यांना दिलेली नाही. पिंपळास येथील शेतकरी नामे दयानंद मोतीराम भोईर व इतर यांनी पोलीस स्टेशन भिवंडी येथे शेतकरी यांनी आशिष शहा यांना आम्ही कोणतीही पॉवर ऑफ एटर्नी दिली नसताना खोटी कागदपत्रे करुन आमच्या जमिनी परस्पर विकलेल्या आहेत अशा प्रकारची तक्रार दिली होती.
एकंदरीत अशिष शहा याने दिलीपकुमार यांच्या कडुन जमिन खरेदी करुन तसेच ७/१२ नावावर करुन देण्याकरीता रुपये अठ्यात्तर कोटी पस्तीस लाख एक्कावन्न हजार एकशे पासष्ठ रुपये घेवून जमिनीचा ताबा दिलेला नाही.आशिष शहा यांनी स्वतःच्या वैयक्तीक फायदयासाठी दिलीपकुमार यांचे पैसे घेतले आहेत.व्यवहार पुर्ण न करता त्यांनी पैसे घेतलेले आहेत.व्यवहार पुर्ण करण्याकरीता आशिष शहा यांचेशी दिलीपकुमार यांनी संपर्क साधला असता आशिष शहा यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
आशिष शहा यांनी दिलीपकुमार यांची आर्थिक व मानसिक फसवणुक केलेली आहे.त्या संदर्भात दिलीपकुमार यांनी आशिष शहा यांच्या विरुध्द कायदेशीर तक्रार केली आहे.त्यानुसार कोनगाव पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या आशिष शहा यांच्या विरोधात बीएनएसएस १७३ च्या अंतर्गत भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ४२०, ४०६, ४६७,४६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.