बाळकडू : वस्त्रहरण' व्यंगचित्रांचे प्रदर्शन

 विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन . 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९व्या जयंतीनिमित्त व्यंगचित्रकार अमित पापळ यांच्या 'बाळकडू : वस्त्रहरण' या राजकीय व्यंगचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. बालगंधर्व कलादालन येथे २८, २९ आणि ३० जानेवारी रोजी सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत प्रदर्शन खुले असणार आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.

 या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, उपनेत्या सुषमा अंधारे, महिला संपर्क संघटिका पुणे स्नेहल आंबेकर, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित राहणार आहेत. शिवसेना पुणे शहराचे प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत आयोजक आहेत.

आयोजक अनंत घरत म्हणाले की, बाळकडू व्यंगचित्र प्रदर्शन म्हणजे या महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाला गलीच्छ राजकारण्यांविषयी आलेला राग असून त्यांच्या व्यक्त झालेल्या भावना आहेत. बाळकडू हि शिवसेनाप्रमुखांची देण आहे.या प्रदर्शांनामध्ये तब्बल १७५ हून अधिक व्यंगचित्र या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.

 

अनंत रामचंद्र घरत 

शिवसेना प्रसिद्धी प्रमुख पुणे.

Post a Comment

Previous Post Next Post