एस. टी तिकिटाची झालेली दरवाढ तात्काळ रद्द करा.. फिरोज मुल्ला (सर )

 

   महाराष्ट्र पॅथर सेनेच्या वतीने एस. टीचे विभागीय अधिकारी मा.  सचिन शिंदे साहेब यांना निवेदन देताना संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला (सर ) व पुणे शहर अध्यक्ष संदीपभाऊ शेंडगे 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी अर्धी तिकीट योजना सुरु केली होती त्यावेळेचे मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब व आताचे मुख्यमंत्री व त्यावेळेचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडवणीस साहेब आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हेतर सतत सांगत होते एस. टी महामंडळ भरपूर नफा होत आहे एस. टी हे सर्वसामान्य लोकांचे साधन आहे योजनेमुळे त्यांचा प्रवास सुखाचा चालला होता पण अस काय झालं सर्वसामान्य महिला पुरुष वर्गाला दिलासा देणारे सरकार आचानकपणे एस. टी तिकीट दरवाढ करून सर्वसामान्य लोकांच्या डोक्यावर नाहक आर्थिक बोजा टाकला आहे आधीच लोक महागाहीने  होरपळत आहे तिकीट दरवाढ करून त्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे त्यामुळे प्रवासी नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर येत आहे 

राज्य सरकारने व एस. टी महामंडळ यांनी तात्काळ निर्णय मागे घ्यावा अन्यथा आम्हाला जनहितार्थ रस्त्यावर उतरून एस. टीचा चक्का जाम करू असे फिरोज मुल्ला (सर )यांनी निवेदन देताना अधिकाऱ्याना सांगितले

Post a Comment

Previous Post Next Post