आयुक्तांकडे मागणी HMVP रोग पुण्यात शिरण्याआधी उपाययोजना करा - शिवसेना पुणे

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :-  देशात सध्या आज HMPV या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे, आपल्या देशाच्या शेजारील चीनमधे याचा पादुर्भाव वाढल्याने अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच आपल्या देशात महाराष्ट्राच्या शेजारील राज्ये गुजरात व कर्नाटक येथे या रोगाचे रूग्ण आढळून आले आहेत. प्रत्येक संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव पुणे शहरात झपाट्याने होतो याचा अनुभव आहेच. मागील स्वाइन फ्लू, कोरोना, सारख्या संसर्गजन्य रोगामुळे महाराष्ट्रात आणि पुण्यात हाहाकार माजविला होता, स्वाईन फ्लूचा भारतातला पहिला रुग्ण पुणे शहरात शाळेतील विद्यार्थीनीच्या माध्यमातून आढळला होता. तदनंतर पुण्यात त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला होता. कोरोना महामारीमुळे पुणे शहरासहित संपूर्ण देशात लाॅकडाउनची परिस्थिती एकदा नाही तर दोनदा ओढवली गेली. 


 अशी परिस्थिती या नवीन संसर्गजन्य रोगाने पुन्हा निर्माण होउ नये म्हणून पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यामार्फत आत्तापासूनच काळजी घेउन फवारणी व तत्सम उपाययोजना करणे गरजेचे वाटते. यामधे घाईघाईने टेंडर काढताना कुठलाही भ्रष्टाचार होणार नाही याबाबत जातीने लक्ष घालावे. त्यामुळे आपण तत्परतेने पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत असलेल्या सर्व खाजगी व सरकारी शाळा तसेच आस्थापना यांचे सॅनिटायझेशन करणे आवश्यक आहे. तसेच शिक्षक, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, गर्दीची ठिकाणे यांची योग्य काळजी घेण्यात यावी. खाजगी क्लासेस, थिएटर,हॉटेल्स , लग्न समारंभ हॉल , बसस्थानक, रेल्वे स्टेशन, जिमच्या मालकांना काळजी घेण्याबाबत सूचना करण्यात याव्यात असे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे पक्षाच्या वतीने पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांना देण्यात आले .

      सदर पत्रास अनुसरून पुणे आयुक्तांनीही तत्पर आरोग्य अधिकाऱ्यांना सदर HMVP वर तत्पर उपाययोजना करण्यास आदेश दिले आणि काळजी घेण्यास कळविले . 

यावेळी निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळात शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकूडे, मा गटनेते अशोक हरणावळ, उपशहर प्रमुख आबा निकम, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, संघटक किशोर रजपूत, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, शहर समन्वयक युवराज पारीख , विभाग प्रमुख प्रविण डोंगरे,चंदन साळुंखे, अतुल दिघे, राहुल जेकटे, अजय परदेशी, दिपक कुंजीर, अजय कुडले, शैलेश जगताप,जुबेर तांबोळी हे शिवसैनिक उपस्थित होते. 



अनंत रामचंद्र घरत 

प्रसिद्धी प्रमुख शिवसेना पुणे .

Post a Comment

Previous Post Next Post