पंजाबच्या मलेरकोटला गावातल्या शिख परिवारच्या वतीने मस्जिद साठी दिली जमीन.

शिख समुदायाच्या वतीने प्रेम अखंडता ऐक्याचे संदेश.


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे प्रतिनिधी :- 

हिंदू- मुस्लिम ऐक्याचे उदाहरण देणारे एक प्रकरण पंजाबमधील मालेरकोटला जिल्ह्यातून समोर आले आहे, जिथे एकीकडे आपल्या देशात द्वेषाचे वातावरण निर्माण होत असताना दुसरीकडे मशिदींवर दर्गे यांच्या वर कारवाईचा प्रकार सुरू आहे. तर दुसरीकडे पंजाब मध्ये एकता आणि अखंडतेचा संदेश देत शीख समुदायाच्या लोकांनी पंजाबमधील उमरपूर गावात मशिदीसाठी जमीन दान देऊन ऐक्याचे संदेश दिले आहे 


मालेरकोटला गावात मुस्लिमांची ५० ते ६० घरे असून तेथील लोकांना नमाज अदा करण्यासाठी दुसऱ्या गावात जावे लागत असल्याची माहिती शीख समुदायाच्या लोकांना कळल्यानंतर येथील शीख समाजाच्या लोकांच्या वतीने आपल्याच गावात मशिदीला जागा दिल्याने तेथील मुस्लिमांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे,  यावेळी सर्व धर्माच्या लोकांनी देशप्रेमाचा उत्तम संदेश सर्वांना दिला आहे  सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जमीयतुल हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी हे सदैव प्रेम आणि एकतेचा संदेश देत असल्याची माहिती आज जमीयत उलेमा पुणेच्या वतीने शाल अर्पण करून पुण्यातील शीख समुदायाचे आभार मानले. 

यावेळी जमियत महाराष्ट्रचे उपाध्यक्ष कारी इद्रिस, ज्ञानी मुखतियार सिंग, युसूफ जकाती, ज्ञानी प्रताप सिंग, मौलाना मुसा, मुख्य सेवेदार अध्यक्ष भोला सिंग अरोरा, मुफ्ती अहमद, मुबशीर शाह, हाफिज बिस्मिल्ला, आसिफ खोकर, कारी शमशेर आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post