कोथरूड मधील नैसर्गिक नाल्यावर महानगर पालिकेची संक्रांत कश्यासाठी आणि कोणासाठी ?

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे:- पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये अनेक जागी अनधिकृतपणे नाल्यांवर अतिक्रमण, बांधकामे झाल्याच्या घटना आहेत त्यावर महानगरपालिकेने अनेकवेळा कारवाई केली आहे. पण कोथरूड परिसरात कर्वे रोडवरील मृत्युंजय मंदीराशेजारील चालू विकास आराखड्यातील तसेच प्रायमुव्ह संस्थेच्या अहवालात दिसणार्‍या  नैसर्गिक नाल्यावर महानगरपालिकेच्या वतीनेच अनधिकृतपणे टेंडर काढून अतिक्रमण करण्यात येत आहे अशी तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुणे शहराच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त यांकडे करण्यात आली. 

४० फुटाहून अधिक मोठा नाला बुजवून तो पाईपलाइन मधे टाकण्यात आला आहे, हे कोणासाठी आणि कश्यासाठी हे प्रशासनाने स्पष्ट करावे, प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा राजकीय दबाव आहे का ? की कोणा विकासकासाठी हा प्रकार चालू आहे ? हा प्रश्न पुणेकर म्हणून आम्हास पडला आहे , पुणे महपालिकेला पुन्हा आंबिल ओढा घटना कोथरूड मधे घडवायची आहे का ? कि ज्याप्रमाणे नदीपात्रालगत अतिक्रमण झाल्याने सिंहगड रस्त्यावरील अनेक सोसायट्यामधे  पावसाच्या पाण्याचा शिरकाव झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. अनेकांना अगदि पहिल्या मजल्यावरील  राहती घर सोडून स्थलांतरीत व्हाव लागल. हिच परिस्थिती कोथरूडकरांवर ओढवून आणायची आहे का ? ओढे नाले बुजवल्याने आगामी पावसाळ्यात पाणी साचून पूराचा फटका कर्वेनगर कोथरूडकरांना नक्की बसणार यात शंका नाही असे प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदनात मांडण्यात आले . तर सदर नाला बुजविण्याचे काम ज्या भागात चालू आहे तिथे समोरच पुण्याचे खासदार मा मुरलीधर मोहोळ, माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे कार्यालय आहे त्यांनी सादर विषयाकडे दुर्लक्ष केले आहे का ? कोथरुडकरांच्या सुरक्षेचा विचार त्यांना नाही का असा सवाल शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. 

   पुणे पालिका प्रशासनाने तत्परतेने सदर अनधिकृत बांधकाम थांबवावे आणि नाल्याला मुक्त करावे तसेच पुण्यातील सर्व नाल्यांचा अभ्यास करून त्यांना अतिक्रमण मुक्त करावे. अन्यथा आम्ही पुण्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच पर्यावरण रक्षणार्थ पुणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयात आंदोलन करू असे आयुक्तांना ठणकावून सांगण्यात आले . 

यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाशी बोलताना आयुक्तांनी सदर विभागाशी निगडीत अधिकारी यांस तत्पर माहिती घेऊन कळविण्याचे निर्देश दिले. 

यावेळी शिष्टमंडळात शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख राजेश पळसकर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, संघटक पराग थोरात, उपविभाग प्रमुख कोथरूड पुरुषोत्तम विटेकर, शैलेश जगताप, संजय साळवी, गणेश पोकळे आणि शिवसैनिक उपस्थित होते .


अनंत रामचंद्र घरत 

प्रसिद्धी प्रमुख पुणे

Post a Comment

Previous Post Next Post