प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण्यातील नवले पुलाजवळ आज सकाळी भीषण रस्ता अपघात झाला, यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. कारमधील तरुण वाढदिवसाच्या पार्टीतून परतत होते. वाटेत कारचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला धडकली.
सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील नवले पुलाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला असून, यामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाताची छायाचित्रे हृदय हेलावणारी आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.