प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : उघड्यावर लघुशंका करताना हटकल्यानं सुरक्षारकावर पिस्तुलातून गोळीबार केला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर परिसरात ही घटना समोर आली आहे.सुरक्षा रक्षकाच्या पत्नीला डोक्यात दगड लागल्यानं ती गंभीर जखमी झाली होती. उपचारादरम्यान शीतल अक्षय चव्हाणचा ( वय 29, रा. चव्हाण वस्ती, थेऊर ) बुधवारी ( दि.1 ) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मृत्यू झाला.
याप्रकरणी अक्षय साहेबराव चव्हाण यानं लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भानुदास शेलार, अजय मुंढे आणि सतीश ऊर्फ नाना मुंढे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आलं आहे. आरोपींनी केलेल्या दगडफेकीत सुरक्षारक्षक चव्हाण याची पत्नी शीतल जखमी झाली होती.
पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊन परिसरात जय मल्हार हॉटेलजवळ मोकळ्या जागेत अक्षय हा सुरक्षारक्षक आहे. अक्षय आणि त्याची पत्नी शीतल तेथे राहायला आहे. शुक्रवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास आरोपी कारमधून आले.
हे आरोपी मोकळ्या जागेत लघुशंका करत होते. तेव्हा, अक्षयनं आरोपींना हटकलं. यातून आरोपींनी अक्षयला शिवीगाळ केला. तसेच, अक्षयला मारहाण करून त्याला दगड फेकून मारला. अक्षयची पत्नी शीतलनं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, आरोपींनी फेकून मारलेला दगड तिला लागल्यानं तिच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली. नंतर आरोपींनी चव्हाण याच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडली.अक्षयनं याची माहिती पोलिसांना दिली. पत्नीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. मात्र, बुधवारी उपचारावेळी शीतलचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आला .
.