गणेश कसबेने ज्या रस्त्याने रॅली काढली , त्याचं रस्त्यावरुन पोलिसांनी आरोपीची धिंड काढली

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : मोक्कातील आरोपीने येरवडा जेलमधून सुटल्यानंतर रॅली काढली होती. मोक्कातील आरोपी गणेश कसबेने समर्थकांसह पुण्यात रॅली काढली होती. या रॅलीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.त्यानंतर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होतं. मोक्का असलेल्या गुन्हेगाराची इतकी बिनाधास्तपणे रॅली काढण्याची धाडसच कसे  होते ? अशी टीका पुणे पोलिसांवर सुरु झाली होती. अखेर पुणे पोलिसांनी या टीकेला कृती मधून उत्तर दिलं आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस देखील ॲक्शन मोडवर आले. ज्या रस्त्याने गणेश कसबेने रॅली काढली. त्याचं रस्त्यावरुन पोलिसांनी आरोपीची धिंड काढली. गुन्हेगारांवर दहशत बसावी व सर्वसामान्यांमध्ये भिती राहू नये यासाठी पुणे पोलिसांनी हे पाऊल उचललं.

रॅली काढणाऱ्या आरोपींना दणका

या प्रकरणी मोक्कातील आरोपी गणेश कसबे उर्फ गुंड्यासह 35 जणांवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील नऊ आरोपींना येरवडा पोलिसांनी अटक करत त्यांची शहरात धिंड काढली. येरवडा पोलिसांनी रॅली काढणाऱ्या आरोपींना दणका दिला. पुणे पोलिसांनी आरोपींची धिंड काढण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी सुद्धा पोलिसांनी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या आरोपींची धिंड काढली आहे. पण पुणे शहरात गुन्हेगारी कमी झालेली नाही. वाहनांची तोडफोड, लुटमार, हत्या

Post a Comment

Previous Post Next Post