प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे..हॅरिस ब्रिज बोपोडी पुलाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्याच्या जवळपास 3 करोड रुपये आतापर्यंत आदा करण्यात आलेल्या रक्कमेच्या कामाचे ऑडिट जनतेसमोर प्रसिद्ध करावे यासाठी पुणेमहानगर पालिकेचे आयुक्त मा. राजेंद्र भोसले साहेब व भवनरचनेचे मुख्य अभियंता मा. युवराज देशमुख साहेब यांना महाराष्ट्र पॅथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला (सर )व पुणे शहर अध्यक्ष संदीपभाऊ शेंडगे यांनी निवेदन दिले
पुणे महानगर पालिके कडून माहिती घेतली असता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्यास व सुशुभीकरणास केलेला खर्च दिसून येत नाही दिलेल्या बजेटचे व जागेवरील वास्तूची पाहणी केल्यास मंजूर करण्यात आलेली रक्कम व आदा केलेली रक्कम यामध्ये कुठेही मेळ बसत नाही म्हणून याचे ऑडिट करण्यात यावे सबंधित ठेकेदारांनी केलेल्या कामाचे पाहणी केल्यास आमच्या निदर्शनास आले आहे की सदरची रक्कम वास्तुसाठी व सुशोभीकरणासाठी खर्च झाले नसल्याचे आढळून येत आहे तरी संबंधित अधिकारी व निविदा धारक यांची चौकशी करून योग्य कारवाई ऑडिट जनतेसमोर प्रसिद्ध करावे
पुढील कार्यवाही तातडीने न झाल्यास आम्हाला लोकशाही मार्गाने जनहितार्थ आंदोलन करू असे निवेदन देताना फिरोज मुल्ला (सर )यांनी सांगितले