निवडणूक आयोगाला भारतीय राज्यघटनेने दिलेले स्वायत्तता अबाधित ठेवून निवडणुकीतील पक्षपात थांबवावा अन्यथा लोकशाही पायाभूत असणाऱ्या या देशात निवडणूक आयोगावर लोकांचा विश्वास राहणार नाही. - कायदे तज्ञ डॉ. असीम सरोदे

जागतिक मतदार दिनाचे औचित्य : काँग्रेस आक्रमक



प्रेस मीडिया लाईव्ह :


पुणे  : जागतिक मतदार दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राज्यभरात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत आक्रमक झाली असून, याच अनुषंगाने पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यघटनेने निवडणूक आयोगाला दिलेले स्वायत्तता अबाधित राखून निवडणूकितील पक्षपात थांबवावा असे निवेदन अप्पर तहसीलदार पुणे यांना सादर करण्यात आले. 

सदर प्रसंगी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्रातील नामवंत कायदेतज्ञ डॉ. असीम सरोदे यांनी म्हटले आहे की, ‘‘राज्यभरात नुकत्याच विधानसभा निवडणूका पार पडल्या आणि निवडणुकीचे निकाल अनाकलनीय, आश्चर्यकारक, अविश्वसनीय व काही तरी गडबड असल्याचे दिसून आले. तसेच राज्यभारत भाजपा व महायुती बद्दल प्रचंड नाराजी होती. अश्या काळात अचानक एवढा मोठा जनाधार भाजपा व महायुतीला मिळावा मोठा अविश्वास निर्माण करणारा निकाल राज्याने पाहिला असून, निवडणूक आयोगाला भारतीय राज्यघटनेने दिलेले स्वायत्तता अबाधित ठेवून निवडणुकीतील पक्षपात थांबवावा अन्यथा लोकशाही पायाभूत असणाऱ्या या देशात निवडणूक आयोगावर असणारा लोकांचा विश्वास हा राहणार नाही.’’
 
यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात व पत्रकार परिषदेस, माजी आमदार रवींद्र धंगेकर,  ॲड. अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चवधरी, गोपाल तिवारी, माजी नगरसेवक रफिक शेख, अविनाश बागवे, श्रीमती लता राजगुरू, सुजाता शेट्टी, राज अंबिके, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, प्राची दुधाने, सुंदर ओव्‍हाळ, सीमा सावंत, शारदा वीर, ज्योती परदेशी, द. स. पोळेकर, ब्लॉक अध्यक्ष राजू ठोंबरे, विशाल जाधव, संतोष पाटोळे, हेमंत राजभोज, संतोष आरडे, वाल्मिक जगताप, भरत सुराणा, सेवादलाचे प्रकाश पवार, मतीन शेख यांच्यासह सर्व आजी-माजी नगरसेवक ब्लॉकचे अध्यक्ष प्रदेश पदाधिकारी, शहर पदाधिकारी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या.

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सुजित आप्पा यादव यांच्या हस्ते डॉ. असीम सरोदे यांचा संविधानाची फोटो फ्रेम व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक अजित दरेकर यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post