प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे शहरात गुरुवारी (२३ जानेवारी) काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद असणार आहे. तर शुक्रवारी (२४ जानेवारी) कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेने दिली आहे. जलवाहिनीने अत्यावश्यक काम करण्यासाठी हा निर्णयपुणे महानगरपालिकेद्वारे शहरात जलवाहिनीचे काम केले जाणार आहे. तळजाई टाकी येथील मुख्य व्हॉल्वचे आणि मुख्य जलवाहिनीचे काम करण्यासाठी कात्रज परिसरातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तरी नागरिकांनी पाणी जपून वापरण्याची विनंती पालिका प्रशासनाने केली आहे.
या संदर्भात महानगरपालिकेने प्रसिद्ध पत्रक सादर केले आहे. यामध्ये २३ जानेवारीला कात्रज परिसरातील भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, चंद्रभागा, निलगिरी सोसायटी, जिजामाता भुयारी मार्ग, धनकवडी, स. नं. ३,४,७,८ तळजाई पठार, मेघदूत सोसायटी, आनंद भवन सोसायटी या भागांमध्ये पाणी येणार नाही असे नमूद करण्यात आले आहे.उद्यानंतर शुक्रवारी २४ जानेवारीला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे पत्रकामध्ये म्हटले आहे. या सर्व गोष्टींची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि पाणी साठवून ठेवावे असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने कात्रज परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.