आझम कॅम्पस येथे प्रजासत्ताक दिन साजरा

सर्वधर्मीय आणि राष्ट्रीय सणांवर सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे प्रजासत्ताक दिनाचा उत्साहपूर्ण कार्यक्रम दि.२६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी साडेआठ वाजता झाला.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे निवृत्त अध्यक्ष मधुकर कोकाटे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.डॉ.उमाकांत दांगट यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तसेच 'डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटी'चे कुलपती डॉ पी.ए.इनामदार होते. या प्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार,सचिव प्रा. इरफान शेख,एस.ए.इनामदार, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष शाहिदा शेख,डॉ.आरिफ मेमन तसेच डॉ.एन.वाय.काझी हे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला आझम कॅम्पसच्या सर्व संस्थांचे प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन  यांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी-शिक्षक यांचे आभार मानले. यावेळी होळी, ओणम, बैसाखी, ईद, राखीपौर्णिमा यांसह विविध धार्मिक आणि राष्ट्रीय सणांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. आकर्षक संचलन, क्रीडा प्रात्यक्षिके, तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेले देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकास पात्र ठरले.




Post a Comment

Previous Post Next Post