प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे (बोपोडी).. हॅरिस ब्रिज बोपोडी पुलाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळ्याच्या 3 करोड रुपये कामाचे ऑडिट करण्यासाठी दिनांक 13/1/2025 रोजी पुणे मनपाचे आयुक्त मा. राजेंद्र भोसले साहेब व मुख्य अभियंता मा. युवराज देशमुख साहेब यांना महाराष्ट्र पॅथर सेनेच्या वतीने फिरोज मुल्ला (सर ) व संदीपभाऊ शेंडगे यांनी समक्ष भेटून निवेदन दिले होते .
त्याची गंभीर्याने दखल घेत त्यांनी कार्यकारी अभियंता भवन पुणे मनपा मा. वीरेंद्र केळकर यांना प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पाठवले असता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे आणि काम पूर्ण होण्यासाठी फार विलंब लागत आहे सुशोभीकरण सुद्धा झाले नाही याची संपूर्ण माहिती स्वतः महाराष्ट्र पॅथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला (सर ) कार्यकारी अभियंता यांना देत होते आणि हे स्मारकाचे काम उत्कृष्ट दर्जाचे लवकरात लवकर झाले पाहिजे आणि 3 करोड रुपये खर्च आतापर्यंत झाला आहे एवढे पैसे खर्च करून पण तसे काम झाले नाही आणि दिसत सुद्धा नाही हे निदर्शनास आणून दिले त्यावेळी पुणे शहर अध्यक्ष संदीपभाऊ शेंडगे व पुणे मनपाचे वरिष्ठ कनिष्ठ अधिकारी उपस्थित होते