हुक्का पार्लर चालकाकडून 20 हजाराची लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक अखेर निलंबित

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : हुक्का पार्लर चालकाकडून 20 हजाराचा लाच घेणारा  पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार अखेर निलंबित करण्यात आले आहे. पुण्यातील वानवडी भागातील अवैध हुक्का पार्लर सुरू ठेवण्यास तो परवानगी देत होता अशी माहिती आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वानवडी परिसरात एका हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी  या ठिकाणी धाड टाकून कारवाई केली. यावेळी पोलिसांनी हॉटेल चालकाचा मोबाईल तपासला असता वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार हाच वेळोवेळी माहिती करत असल्याचे समोर आले. इतकचं नाही, तर या पोलीस उपनिरीक्षकाला संबंधित हॉटेल चालक दरमहा वीस हजार रुपये हप्ता देत असल्याचंही समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी या संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post