केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरुद्ध 'जवाब दो' आंदोलन करणार .......अतिक्रमण विरोधी कारवाईचा निषेध ..

 पथारी विक्रेत्यांसाठी केंद्राच्या योजनेची अंमलबजावणी व्हावी :जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघ

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत 'स्वनिधी से समृध्दी' (विस्तारीत टप्पा ५) कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे महापालिकेला आदेश द्यावेत , विक्रेत्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करावे तसेच हे सर्वेक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत अतिक्रमणविरोधी कारवाई थांबवावी,अशी मागणी जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाने  केंद्रीय सहकार, नागरी उड्डान  राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे  पत्रकाद्वारे पुन्हा एकदा केली आहे. या मागणीला 'लोकजनशक्ती पार्टी रामविलास' या पक्षाने पाठिंबा दिला असून पथारी विक्रेत्यांसाठी मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे.जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाचे संस्थापक संजय आल्हाट,सरचिटणीस रणजीत सोनवळे, पुणे शहराध्यक्ष कन्हैया पाटोळे ,महिला आघाडी प्रमुख  कल्पना जावळे यांनी हे पत्रक रविवार 5 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्धीला दिले आहे. 


दि.३ ऑगस्ट २०२४ रोजी मोहोळ यांची भेट घेऊन जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी महासंघाने केंद्र सरकारच्या धोरणाची माहिती मोहोळ यांना दिली होती .अंमलबजावणीची विनंती केली होती. या धोरणानुसार नंतर एकही काम झाले नसून तरीही पुण्यात मोठी अतिक्रमण कारवाई मात्र फर्गसन रस्ता व इतरत्र सुरू आहे. याचा निषेध पथारी विक्रेता संघाने केला आहे .मोहोळ यांच्या आदेशाने ही कारवाई सुरू असल्याने त्यांच्या विरोधात 'जवाब दो' आंदोलन कोथरूड येथे लवकरच केले जाणार आहे असे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे. या आंदोलनाला देखील 'लोकजनशक्ती पार्टी रामविलास' या पक्षाने पाठिंबा दिला आहे.

 आयुक्त ते केंद्रीय मंत्री पातळीवर झाली निराशा

 पथ विक्रेता राष्ट्रीय धोरण अस्तित्वात आल्यावर पुणे पालिकेने दहा वर्ष अंमलबजावणी केलेली नाही.गेली दहा वर्ष पथविक्रेता योजनेच्या कुटुंबियांचे सर्वेक्षण प्रलंबित आहे. केंद्र सरकारच्या योजनांचा पथ विक्रेत्यांना लाभ मिळवून देणेकामी व जोपर्यंत पथारी विक्रेत्यांचे बायोमॅट्रिक सर्वेक्षण २०२४ पर्यंत होत नाही तोपर्यंत पथारी विक्रेत्यावरील  कारवाई थांबवावी, असे पत्र यासंदर्भात जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाने  २६ फेब्रुवारी २०२४ रोजी दिले होते.त्यावर आयुक्तांकडून  कोणतेही  उत्तर मिळालेले नाही ,दुसरीकडे पथारी विक्रेत्यांवर अन्यायकारक कारवाई केली जात आहे. पथारी विक्रेत्यांना एकत्रितपणे या योजनेची माहिती देऊन  मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, असे यावेळी संजय आल्हाट यांनी सांगितले.

.........................................

सोबत माहितीसाठी  : श्री मोहोळ यांना दिलेले ३ ऑगस्ट २०२४ चे  निवेदन ,निवेदन देतानाचा  फोटो आणि त्यावेळचे कात्रण 





Post a Comment

Previous Post Next Post