प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : खासगी रुग्णालयांतील उपचार दरांच्या पारदर्शकतेसाठी रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. असे असतांनाही या नियमांकडे दुर्लक्ष करणार्या २२ खासगी रुग्णालयांवर पुणे महापालिकेने कारवाई केली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने 'कारणे दाखवा' नोटीस पाठवली आहे.
राज्यातील आरोग्य विभागाने सर्व खासगी रुग्णालयांची पडताळणी करण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत पुणे शहरातील ८५० रुग्णालयांची पडताळणी पूर्ण झाली आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयांमधून प्रत्येक एक याप्रमाणे पथके नेमण्यात आली होती. रुग्णालय पडताळणीच्या वेळी रुग्णालयांनी दरपत्रक, रुग्ण हक्कांची सनद, तक्रार निवारणासाठी 'टोल फ्री' क्रमांक लावले नसल्याचे आढळून आले. अनेक नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार आरोग्य विभागाने ही कारवाई केली आहे.