प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : संगीतकार ओ.पी.नय्यर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'ओ.पी.नय्यर यांच्या संगीत कारकिर्दीतील तीन स्थित्यंतरे' या दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार,दि.२८ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता राजलक्ष्मी कलादर्शन सभागृह (डी.पी.रस्ता,कोथरूड) येथे हा कार्यक्रम रवींद्र केळकर,हेमंत पाकणीकर आणि सतीश पाकणीकर सादर करणार आहेत.
राजलक्ष्मी कलादर्शन सभागृह आणि ऍड्रॉईट पब्लिकेशन यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.ओ.पी.नय्यर या प्रतिभाशाली व मनस्वी संगीतकाराच्या सिने संगीतातील तीन वेगवेगळी स्थित्यंतरे कधी,कशी आणि कोणत्या प्रकारे झाली,याचा मागोवा या कार्यक्रमात घेतला जाणार आहे.प्रवेश विनामूल्य असून उपस्थित राहण्याचे आवाहन विवेक पाध्ये,राजीव डिंगणकर यांनी केले आहे.
या कार्यक्रमात 'ओ.पी.नय्यर-क्या बात है इस जादूगार की' हे सतीश पाकणीकर निर्मित आणि पं शिवकुमार शर्मा यांचा सहभाग असलेले पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.