पुणे शहरात अस्वच्छता करणार्‍या नागरिकांविरुद्ध महापालिकेकडून दंडात्मक कारवाई

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :  सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार्‍या आणि सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणार्‍या बेशिस्त नागरिकांविरुद्ध महापालिकेकडून १ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत दंडात्मक कारवाई केली आहे.या कारवाईत ४ सहस्र ५१९ नागरिकांकडून ३६ लाख ३४ सहस्र ३५२ रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

महापालिकेकडून यापूर्वी शहरात अस्वच्छता करणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांकडे दायित्व देण्यात आले होते; मात्र दैनंदिन कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या कामामुळे क्षेत्रीय कार्यालयांकडून शहरात प्रभावी कारवाई होत नव्हती. त्यामुळे महापालिकेने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर १५ गस्त पथकांची निर्मिती केली, तसेच परिमंडळ स्तरावर ३ पथकांनी विशेष वाहनांमधून शहरात गस्त घालण्यास प्रारंभ केला.


Post a Comment

Previous Post Next Post