प्रेस मीडिया लाईव्ह :
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पालकमंत्र्यांची यादी महायुती सरकारने जाहीर केली. यावेळी तीन मंत्र्यांना सहपालकमंत्रीही करण्यात आले आहे. अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व घेतले आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांना मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले आहे. चंद्रकांत बावनकुळे हे नागपूरसह अमरावतीचा पदभार सांभाळतील.
चंद्रकांत पाटील हे सांगलीचे तर शंभूराजे देसाई सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. यावेळी धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलेले नाही. पंकजा मुंडे यांना जालन्याचे तर राधाकृष्ण विखे पाटील यांना अहिल्यानगरचे पालकमंत्री करण्यात आले आहे. आशिष शेलार यांना मुंबई उपनगरचे पालकमंत्री करण्यात आले आहे.
त्यांच्यासोबत मंगलप्रभात लोढा हे सहपालकमंत्री असतील. तसेच प्रकाश आबिटकर यांना कोल्हापूरचे पालकमंत्री करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत माधुरी मिसाळ यांना सहपालक मंत्री करण्यात आले आहे. फडणवीस यांच्यासह आशिष जयस्वाल यांना गडचिरोलीचे सहपालकमंत्री करण्यात आले आहे.