अवैध बांगलादेशी रोहंगिया यांची महाराष्ट्रात घुसखोरी हे तर फडणवीस आणि अमित शहा यांचे अपयश : मुकुंद किर्दत, आप

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई मध्ये सैफ अली खान या अभिनेत्यावर खुनी हल्ला करणारा हा बांगलादेशी घुसखोर असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे .एकीकडे महाराष्ट्रामध्ये काही बांगलादेशी पुण्यासारख्या भागात जमीन खरेदी करत असल्याचे आढळले होते तर मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी असल्याचा आरोप भाजपचेच नेते करीत आहेत. 

दिल्लीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तरांचलच्या मतदारांना अवैध रोहांगिया बांगलादेशी ठरवून त्यांची नावे कमी करण्याचे षडयंत्र भाजप राबवत आहे तर महाराष्ट्रात किरीट सोमय्या अशाच पद्धतीचा आरोप मुंबईमध्ये करीत आहेत. मुळात देशाच्या आणि अनेक राज्याच्या सीमा ओलांडून अवैध बांगलादेशी येतात याला जबाबदार कोण? *केंद्र सरकारही भाजपचे आणि महाराष्ट्रतही सरकार भाजपचे असे डबल इंजिन असताना हे बांगलादेशी सहजपणे महाराष्ट्राच्या भागांमध्ये स्थायिक होत आहेत यासाठी गृह खात्यालाच जबाबदार धरायला लागेल.

परंतु अवैध बांगलादेशी आणि रोहिंगला ठरवून इतर मतदारांना यादीतून वगळण्याचं षडयंत्र आम आदमी पार्टी महाराष्ट्र तरी चालवून देणार नाही. मागील वर्षी जवळपास 200 प्रकरणांची नोंद पोलिसांमध्ये झालेली आहे तर अंदाजे तीनशे बांगलादेशी नागरिकांना अटक झालेली आहे. *आता सैफ अली या अभिनेत्यावरील हल्ल्याच्या निमित्ताने पुन्हा हा प्रश्न पुढे आला असून भाजप नेते यावर विद्वेषाचे राजकारण करु पहात आहेत, परंतु हा मुद्दा गृहखात्याच्या अपयशाचा आहे* गृहमंत्री म्हणून या हल्ल्याची जबाबदारी घेत फडणवीस यांनी सैफ अली खान व  सामान्य नागरिकांची माफी मागायला हवी.

- मुकुंद किर्दत, आप राज्य प्रवक्ते

Post a Comment

Previous Post Next Post