आळंदीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) 

आळंदी येथे विविध समाज घटकातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना वेंकटेश बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने पुरस्कार वितरित करण्यात आले. . 

संस्थेच्यावतीने दरवर्षी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा विविध पुरस्काराने सन्मान करण्यात येत असतो. या पुरस्काराने निश्चितच आणखी समाजकार्य करण्याची ऊर्जा मिळत असते आणि त्यांनी समाजहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत अशा मान्यवरांना सन्मानित केले जाते ज्यामुळे पुढील काळात समाजहिताचे अनेक उपक्रम राबविण्यात येतील व अशा समाजसेवकांचा सत्कार करून त्यांची पाठ थोपटण्याचे कार्य वेंकटेश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही दरवर्षी करत असते असे संस्थेचे अध्यक्ष शिवकुमार देवकाते यांनी सांगितले 


या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कर्जदार हक्क संरक्षण संघटनेचे अध्यक्ष मा. रियाज मुल्ला, संघटनेचे महाराष्ट्र सचिव डॉ. बाळासाहेब विभुते, पक्षमुक्त भारत अभियानाचे प्रमुख डॉ. सचिन पेठकर, त्याचबरोबर प्रमुख उपस्तिथी सौ. कल्पना मासाळ, सरपंच परिषदेचे मा. रेखाताई टापरे, माहिती अधिकार संघटनेचे सचिव मा. अंजली लोखंडे तसेच महाराष्ट्रातून ५५ पुरस्कारार्थी उपस्थित होते


यावेळी पक्षमुक्त भारत अभियानाचे प्रमुख डॉ. सचिन पेठकर यांनी देशात जे राजकीय पक्ष सुरु आहेत आणि या राजकारणामुळे लोकशाही कशी संपवली जात आहे यावर मार्गदर्शन केले त्याचबरोबर कर्जदार हक्क संरक्षण संघटनेचे अध्यक्ष मा. रियाज मुल्ला यांनी बँकांमार्फत कर्जदारांची कशी पिळवणूक केली आहे यावर त्यांनी थोडक्यात माहिती दिली त्याचबरोबर आपल्या देशात एक म्हणजे भारतीय एक रुपयाची नोट ( १ रु. कागदी चलन ) दुसरे म्हणजे २ रु. ते २००० रु. च्या आरबीआय बँकनोट ह्या दोन वेगवेगळ्या करन्सी ( रुपये ) चलनात असल्याची खळबळजनक माहिती मुल्ला यांनी दिली संघटनेचे सचिव डॉ. बाळासाहेब विभुते यांनी कर्जदार आणि बँक यांच्यामध्ये वादविवाद कसा निर्माण होतो आणि संघटना कशी मदत करते यावर मार्गदर्शन केले 

त्याचबरोबर माहिती अधिकार संघटनेचे सचिव मा. अंजली लोखंडे यांनी माहिती अधिकार कायदा २००५ यावर खूप छान असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री कुंडे यांनी केले. 

 

या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व पुरस्कृत मान्यवरांचा प्रमुख पाहुण्यांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम संस्थापक अध्यक्ष शिवकुमार देवकाते, यांनी आलेल्या सर्व पाहुणे व मान्यवरांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमासाठी हातभार लावणारे  कांताजी आखाडे, युवा उद्योजक आबासाहेब देशमुख, प्रकाश खोपडे माधव उत्तलवाड, पंढरीनाथ जायनुरे, अनेक जण उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post