नव्या पेठेत झाडांचा वाढदिवस साजरा

 



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :' सुधीर काळे मित्रपरिवार' च्या वतीने नव्या पेठेतील ठोसर पागा येथे लावलेल्या आणि जगलेल्या झाडांचा वाढदिवस २३ जानेवारी २०२५ रोजी साजरा करण्यात आला. पत्रकार भवन समोरील या जागेत आवळा,नारळ,कडुनिंब,पेरू,भोकर,अंजीर सारखी झाडे दरवर्षी २३ जानेवारी रोजी लावली जातात, जगवली जातात आणि त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो.यावेळी सुधीर काळे,जेष्ठ नागरिक सदाभाऊ भोरेकर,डी.के.कोलते,काका कुलकर्णी ,सागर पवार,रवींद्र म्हालीम,नलिनी दोरगे, संजय शिर्के आदी उपस्थित होते.गेली अनेक वर्षे सुधीर काळे मित्रपरिवारतर्फे नित्यनेमाने  देशी झाडे लावून वृक्षसंवर्धन सारखा पर्यावरणपूरक कार्यक्रम आयोजित केला जातो.

 झाडे लावून न थांबता  लावलेल्या झाडांची निगा राखली जात आहे का नाही याvवर कार्यकर्ते करडी नजर ठेवून असतात व त्याचे संगोपन करतात.या कार्यास तिथे काम करणारे महानगरपालिकेचे कर्मचारी mमदत करतात. यावेळी कार्यक्रमात बोलताना सुधीर काळे म्हणाले,' भविष्यातील आपल्या येणाऱ्या पिढीला प्रदूषण मुक्त जगवायचे असेल तर पर्यावरण पूरक विधायक कार्य हाती gघेतले पाहिजे.'




.

Post a Comment

Previous Post Next Post