शिंदे गट , भाजप मधील सुरु झालेला वाद आता महापालिका निवडणुकीतही पाहायला मिळणार

  

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : राज्यात महायुतीनं सरकार स्थापन केलं असलं तरी अनेक वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. खातेवाटपावरुन शिंदे गट आणि भाजपमधील सुरु झालेला वाद आता महापालिका निवडणुकीतही पाहायला मिळणार आहे.भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांच्या जागा ह्या आमच्याच असल्याचा दावा शिंदे गटाच्या शिवसेनेनं केला आहे. यासंदर्भात शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरुन आणि निकालानंतर खातेवाटपावरुन शिंदे गट आणि भाजप यांच्यात नाराजी नाट्य पाहायला मिळाले. पक्षातील बड्या नेत्यांनी हे चित्र लपवण्याचा प्रयत्न केला. पण आता या वादाची ठिणगी पुण्यात पडली आहे. 

नाना भानगिरे काय म्हणाले...?

नाना भानगिरे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. शिवसेनेने यापूर्वी लढलेल्या जागांवर शिवसेनेचा हक्का असल्यामुळं त्या जागांवर शिवसेनेचेच उमेदवार निवडणूक लढवतील अशी भूमिका नाना भानगिरे यांनी मांडली आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेने जितक्या जागांवर निवडणूक लढवली आहे. तेवढ्या जागांवर आता आम्ही निवडणूक लढवणार आहे अस भानगिरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

तसेच, शहरातील सर्व प्रभागांमध्ये निवडणुक लढविण्याच्यादृष्टीने आमच्या पक्षाच्या बैठका सुरु आहेत. मतदार नोंदणी, संपर्क अभियान राबविलं आङे. 35 ते 40 जागांवर आम्ही निवडणूक लढवणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडकीवेळी आम्ही युतीतील घटक पक्षांच ऐकलं आहे. आता वरिष्ठ जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असही यावेळी भानगिरे म्हणाले. तसेच, यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीची माहितीदेखील दिली. यावेळी पक्षाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अजय भोसले यांच्यासह महिला पदाधिकारीदेखील उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post