पूना कॉलेजमध्ये गणतंत्र दिनानिमित्त पारंपरिक पोशाक स्पर्धेचे आयोजन



प्रेस मीडिया लाईव्ह :

पूना कॉलेजच्या NSS +2 युनिटतर्फे गणतंत्र दिनाच्या निमित्ताने पारंपरिक पोशाक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. इकबाल शेख आणि उपप्राचार्य इम्तियाज आगा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.

कार्यक्रमाचे आयोजन जुबेर पटेल, अशद शेख, इम्रान पठाण, वसुधा व्हावल, समीर रंगरेज आणि रुखसाना मानेरी यांच्या सक्रिय सहभागाने व सहकार्याने करण्यात आले.

या स्पर्धेत एकूण 63 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेचे सादरीकरण केले. स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांकासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय परंपरा व संस्कृतीबद्दल आदरभाव जागृत करण्याचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व संचालन NSS +2 युनिटने केले असून, उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी यासाठी आयोजकांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post