प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे..सरपंच संतोष देशमुख आणि शहिद सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजवादी पक्षाच्या वतीने पुणे शहर अध्यक्ष जामवंत मनोहर यांच्या नेतृत्वाखाली 24 तासाचे लाक्षणीक उपोषण घेण्यात आले आहे उपोषणामध्ये सहभागी होऊन पाठिंबा देताना महाराष्ट्र पॅथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला (सर )व पुणे शहर अध्यक्ष संदीपभाऊ शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते
पुणे स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आज दुपारी १२ वाजता पासून २४ तासांचे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे ते उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू असणार आहे ... अशा परिस्थितीत संवेदनशील, मानवतावादी, संविधानवादी, गप्प बसता कामा नये... सहभागी व्हा...