प्रेस मीडिया लाईव्ह :
महायुतीत शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप असल्याने कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद कुणाकडे जाणार ? याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. अशातच आता पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर आली आहे.
मागच्या सरकारच्या वेळी पुणे जिल्ह्यांचं पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री 'अजित पवार' यांच्याकडे होते. यावेळी देखील त्यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्री पद दिलं जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच संतोष देशमुख प्रकरणात बीड जिल्हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांना या जिल्ह्याचं पालकमंत्री पद देऊ नये म्हणून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याचं देखील पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे राहिल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
यातच रायगड जिल्ह्यांचं पालकमंत्री पदावरून मागच्या सरकारच्या काळात देखील अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच होती. मात्र यंदा मंत्री भरत गोगावले यांचा दावा मोठा मानला जात आहे. त्यामुळे कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे कोणत्या जिल्ह्यांचं पालकमंत्री पद जाणार ? त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे. याचसोबत असे अनेक जिल्हे आहेत. त्याठिकाणी एका पेक्षा अधिक कॅबिनेट मंत्री आहेत. त्या ठिकाणी देखील पेच निर्माण झाला आहे.
पालकमंत्री पदाची संभाव्य यादी
गडचिरोली - देवेंद्र फडणवीस
नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे
सातारा - शिवेंद्रराजे भोसले
अहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटील
अमरावती - चंद्रकांत पाटील
अकोला - आकाश फुंडकर
धुळे - जयकुमार रावल
लातूर - गिरीष महाजन
मुंबई उपनगर - मंगलप्रभात लोढा/ आशिष शेलार
नंदुरबार - अशोक वुईके
पालघर - गणेश नाईक
सिंधुदुर्ग- नितेश राणे
सोलापूर - जयकुमार गोरे
वर्धा - पंकज भोयर
ठाणे - एकनाथ शिंदे
छत्रपती संभाजी नगर - संजय शिरसाठ / अतुल सावे
जळगाव - गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे
यवतमाळ - संजय राठोड
हिंगोली - आशिष जैस्वाल
मुंबई शहर - प्रताप सरनाईक
नाशिक - दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा
रायगड - भरत गोगावले / आदिती तटकरे यांचाही दावा कायम
रत्नागिरी - उदय सामंत
पुणे - अजित पवार
बीड - अजित पवार
कोल्हापूर - हसन मुश्रीफ
अकोला - माणिकराव कोकाटे/ आकाश फुंडकर यांचाही दावा आहे.
भंडारा - मकरंद पाटील
चंद्रपूर - नरहरी झिरवळ