हिंजवडी आयटी पार्क येथे रेडीमिक्स डंपर खाली चिरडून दोन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी ठार.

रेडीमिक्स डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात, वाहनचालक मद्यपान केल्याने अपघात.

प्रेस मीडिया लाईव्ह : 

चंद्रशेखर पात्रे : 

 पिंपरी-चिंचवड : भीषण अपघातात दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी बळी गेला. भरधाव जाणारा रेडिमिक्स डंपर वळण घेताना अचानक पलटी झाला. त्याचवेळी दुचाकीवरून चाललेल्या दोन विद्यार्थिनी डंपरखाली सापडल्या आणि चिरडल्या गेल्या. दोन्ही विद्यार्थिनींचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. ही घटना हिंजवडी - माण रस्त्यावरील वडजाईनगर कॉर्नरजवळ शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. डंपरचालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.


प्रांजली महेश यादव (वय २२, रा. गोदरेज प्रॉपर्टीज, म्हाळूंगे, ता. मुळशी, मुळ - टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) आणि अश्लेषा नरेंद्र गावंडे (वय २२, रा. गोदरेज प्रॉपर्टीज, म्हाळूंगे, ता. मुळशी, मुळ - शेगाव, रहाटगाव रोड, अमरावती) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन विद्यार्थिनींची नावे आहेत. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र कुराडे यांनी याबाबत माहिती दिली. प्रांजली आणि अश्लेषा या एमआयटी कॉलेजध्ये विज्ञान शाखेत शेवटच्या वर्षात शिकत होत्या. शुक्रवारी सायंकाळी त्या दुचाकीवरून चालल्या होत्या. हिंजवडी - माण रस्त्यावर वडजाईनगर कॉर्नरजवळ बेदरकारपणे वाहन चालवत भरधाव आलेल्या डंपर चालकाचे वळणावर नियंत्रण सुटले आणि डंपर

पलटी झाला. याचवेळी तेथून चाललेल्या दुचाकीस्वार प्रांजली आणि अश्लेषा या डंपरखाली सापडल्या. या भीषण अपघातात दोन्ही तरूणींचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस, वाहतूक पोलीस, आणि

अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. तीन क्रेनच्या मदतीने डंपर बाजूला घेण्याचे काम करण्यात आले. या अपघातामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, २२ वर्षीय डंपरचालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

डंपर मध्ये ३२ टन सिमेंट

पलटी झालेल्या डंपरमध्ये तब्बल ३२ टन सिमेंट भरलेले होते. भरधाव चाललेल्या डंपरचालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्याने डंपर पलटी झाला आणि ३२ टनाच्या या बोजाखाली दबल्या गेल्याने दोन्ही तरूणींचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. छिन्नविछीन्न अवस्थेतील त्यांच्या मृतदेहाचे तुकडे फावड्याने गोळा करताना अग्निशमन दलाच्या जवानांनाही गहिवरून येत होते.

वेळ आली होती... पण काळ नाही...

भरधाव डंपर दोन तरूणींच्या अंगावर पलटी झाला, त्याचवेळी तेथून एक तरूणही दुचाकीवरून चालला होता. मात्र, डंपर पलटी होत असल्याचे पाहताच त्याने दुचाकी सोडून पळ काढला आणि तो बालंबाल बचावला. एक फुट जर तो तरूण पुढे गेला असता तर तो सुद्धा डंपरखाली सापडला असता.

Post a Comment

Previous Post Next Post