प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी चिंचवड : मोहिउद्दीन शेख :
शिक्षण विभाग (प्राथमिक) व एज्युकेशन इनिशियेटीव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अहमदाबाद (1) यांच्या संयुक्त- विद्यमाने थोर भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ञ तथा पहिल्या महिला शिक्षिका श्रीमती सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त ,उर्दू शालेय अभ्यासक्रमावर आधारित संगणक कक्षाचे उद्घाटन खालील मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. विजयकुमार थोरात साहेब (सहाय्यक आयुक्त शिक्षण विभाग) यांचे करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती मा. संगीता बांगर मॅडम (प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग) मा.खान रजिया नियाज (सहा. प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग) मा. मोमीन हमीदा अ. करीम (पर्यवेक्षिका शिक्षण विभाग) शाळेचे मुख्याध्यापक : मा.अब्दुल सलाम इनामदार तसेच मा. रितेश अगरवाल (वाईस प्रेसिडेंट, शिक्षा) मा. काशिनाथ झा (प्रोग्राम मॅनेजर) मा. कुंदन सुथार (प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर) मा. हिमाद्री कुमार मंडल (डायरेक्टर माईंड स्पार्क ऑपरेशन्स) मा. आनंद सुरवडे (प्रोजेक्ट लीड मॅनेजर) मा. प्रशंसा तिवारी (प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर) मा. सविता वर्मा (प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर) शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,शिक्षणप्रेमी अकिल मुज्जावर,इखलास सय्यद ,बशीर सुतार, गुलामभाई शेख,पत्रकार:- मोहयद्दिन शेख,शिख्रुला खान, सफिक शेख,पिक अप बीड्स आय टी कंपनीचे संचालक अमजद खान, शिक्षक संघटनेतर्फे विलास पाटील संजय येनारे, संतोष उपाध्ये पालीकेचे सामान्य प्रशासन विभागाचे मा. गणेश जाधव उपस्थित होते.
या प्रसंगी प्रतिमेचे पूजन प्रशासन अधिकारी सौ. संगीता बांगर मॅडम यांच्या हस्ते व संगणक कक्षाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त शिक्षण विभाग मा. विजयकुमार थोरात साहेब यांच्या हस्ते झाले विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी मध्ये सावित्रीबाई यांच्या जयंतीनिमित त्यांच्या विषयी विद्यार्थ्यांनी भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पठाण रुबिना निसार यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत तांबोळी तरुनुम रहीम व इनामदार आसिया अल्ताफ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोमीन मोसिन सलीम व शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. बाबुर्डे तबुस्सुम यांनी मान्यवरांचे आभार मानले.