प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षक प्रसारक मंडळ अंबप , संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन ,(बी.एड) पेठ वडगाव . या महाविद्यालयामध्ये शनिवार दि.18 जानेवारी, 2025 रोजी महाविद्यालयामध्ये बी.एड.प्रथम व द्वितीय वर्षासाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा व B.ed प्रथम वर्षासाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
या स्पर्धेचे प्राचार्या डॉ. निर्मळे आर.एल. मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले. प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. वेगवेगळ्या पारंपारिक वेशभूषा करून सर्व विद्यार्थी महाविद्यालया मध्ये उपस्थित होते. या सर्व स्पर्धकांमध्ये मुली व मुलांच्या मध्ये क्रमांक काढण्यात आले व या सर्व विजेत्या स्पर्धकांचे प्राचार्या डॉ. निर्मळे आर.एल. मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पाककला स्पर्धेसाठी विविध पदार्थांची सुरेख मांडणी केली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्या मॅडम यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.यामध्ये विविध स्पर्धक विविध पदार्थांच्या सहित सहभागी झाले होते. या पाककला स्पर्धेचे प्रिन्सिपल मॅडम व सर्व प्राध्यापक वर्ग यांनी परीक्षण करून क्रमांक काढले व विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला.
पाककला स्पर्धेमध्ये आएशा बिजली, माधुरी जाधव, प्रणिता पाटील, सुषमा देसाई, वैभवी शिंदे, रुफिया मोमीन व अभिजीत सावंत या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. उत्स्फूर्त सहभागामध्ये प्रगती चौगुले या विद्यार्थिनींनी आपले लाठी काठी कौशल्य याचे प्रदर्शन केले. तसेच गायन व वादन तज्ञ प्रथम वर्षातील विद्यार्थी महेश शिकलगार व ऋषिकेश कोळी यांनीही आपल्या तंत्रशुद्ध गायन व वादनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. निवेदिता पाटील या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सुषमा देसाई व सुजित खोत यांनीही उस्पर्तपणे गायन केले. शेवटी प्राचार्या मॅडम यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले.मॅडमांनी सर्व विद्यार्थ्यांचे व स्पर्धकांचे कौतुक केले व अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले अशाप्रकारे विविध कलागुण प्रदर्शनाच्या माध्यमातून महाविद्यालयामध्ये आजचा दिवस संपन्न झाला. सर्व उपक्रमांसाठी संस्था अध्यक्ष माननीय विजयसिंह माने साहेब यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.
हा उपक्रम संपन्न करण्यासाठी प्राचार्या डॉ. निर्मळे आर.एल., प्रा. सोरटे एस. के. प्रा. शिरतोडे व्ही.एल. प्रा. सावंत ए.पी. प्रा. डॉ. पवार ए. आर. ग्रंथपाल चौगुले एस. एस. सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.