वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवडा साजरा करण्यात आला.

प्रेस मीडिया लाईव्ह :

 श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ,अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी. एड) पेठ वडगाव या  महाविद्यालयांमध्ये 1जानेवारी ते 15 जानेवारी 2025 पर्यंत वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवडा साजरा करण्यात आला. 11 जानेवारी 2025 शनिवार या दिवशी आपल्या कॉलेजमध्ये स्थानिक लेखक व नव साहित्याची ओळख हा कार्यक्रम घेण्यात आला. 

या  कार्यक्रमासाठी प्रथम वर्षातील सर्व छात्राध्यापक उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लेखिका प्रा.डॉ.निर्मळे आर. एल.मॅडम होत्या.या कार्यक्रमांमध्ये लेखिका प्राचार्या डॉ.निर्मळ आर. एल. यांनी विद्यार्थ्यांना नवनवीन पुस्तकांची व साहित्यांची ओळख करून दिली. तसेच पुस्तक वाचण्यासाठी त्यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वर्ग व ग्रंथपाल या सर्वांनी मिळून या कार्यक्रमाचे आयोजन केले.त्यासाठी प्रा.शिरतोडे मॅडम, सावंत मॅडम ग्रंथपाल चौगुले मॅडम यांनी योग्य ते मार्गदर्शन केले. या पंधरवड्यातील सर्व कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष विजयसिंह माने  साहेब यांचेही मोलाची सहकार्य लाभले. तसेच आपल्या कॉलेजच्या प्राचार्या डॉ. निर्मळे आर. एल.  प्राध्यापक वर्ग व सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post