प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक, मंडळ अंबप, संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बी एड पेठवडगाव या महाविद्यालयामध्ये एक जानेवारी ते 15 जानेवारी 2025 पर्यंत वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवडा साजरा करण्यात आला .
13 जानेवारी 2025 सोमवार या दिवशी कॉलेजमध्ये *लेखिका व विद्यार्थी वाचन संवाद* असा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये प्रथम वर्ष छात्राध्यापक उपस्थित होते या कार्यक्रमासाठी लेखिका प्राचार्या डॉ.निर्मळे आर .एल. या आपल्या कॉलेजच्या प्राचार्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या .तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकाबद्दल वाचण्याची अभिरुची निर्माण करण्यास प्रेरणादायी मार्गदर्शन केले .
विद्यार्थी वाचन संवादामध्ये योग्य आणि अचूक मार्गदर्शन केले . छात्राध्यापक या कालावधीमध्ये कोणत्या प्रकारचे वाचन करावे व भविष्यात उपयोगी अशा कोणत्या साहित्याचे वाचन करावे व ते वाचन कशाप्रकारे असावे याविषयी लेखिका निर्मळे मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही वाचनाविषयी आवड निर्माण होण्यासाठी आवश्यक विषयावरती चर्चा करून योग्य तो संवाद साधला.कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व ग्रंथपाल या सर्वांनी मिळून या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यासाठी प्रा. सावंत मॅडम, प्रा. शिरतोडे मॅडम ,ग्रंथपाल चौगुले मॅडम यांनी योग्य ते मार्गदर्शन केले .
या पंधरवड्यातील सर्व उपक्रमांसाठी संस्था अध्यक्ष विजयसिंह माने साहेब यांचेही मोलाचे सहकार्य लाभले तसेच आपल्या कॉलेजच्या प्राचार्या डॉ. निर्मळे आर एल प्रा. सावंत ए पी ,प्रा. शिरतोडे व्ही एल ,ग्रंथपाल चौगुले एस एस, श्री चव्हाण आर आर व सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.