प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षक प्रसारक मंडळ अंबप , संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन ,(बी.एड) पेठ वडगाव . या महाविद्यालयामध्ये 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 पर्यंत "वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवडा" या कार्यक्रमांतर्गत शुक्रवार दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाच्या छात्राध्यापकांच्या उपस्थितीमध्ये वाचन कौशल्य कार्यशाळा , पुस्तकाचे सामूहिक वाचन व पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा हे उपक्रम घेण्यात आले.
उपक्रमासाठी प्राचार्या डॉ. निर्मळे आर.एल मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी कथा, कादंबऱ्या यांची निवड करून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांचे वाचन करून घेण्यात आले. विद्यार्थ्यांचे ग्रुप करून सामूहिक पुस्तकाचे सामूहिक वाचन हा उपक्रम घेण्यात आला.विद्यार्थ्यांनी वैयक्तिक पुस्तक वाचन करून त्या पुस्तकाचे परीक्षण करून अनुभव कथन केले. त्यासाठी प्राध्यापक सोरटे सर ,पवार मॅडम, ग्रंथपाल चौगुले मॅडम यांनी योग्य ते मार्गदर्शन केले. या पंधरवड्यातील सर्व उपक्रमांसाठी संस्था अध्यक्ष माननीय विजयसिंह माने साहेब यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.
हा उपक्रम संपन्न करण्यासाठी प्राचार्या डॉ. निर्मळे आर.एल., प्रा. सोरटे एस. के. प्रा. शिरतोडे व्ही.एल. प्रा. सावंत ए.पी. प्रा. पवार ए. आर. ग्रंथपाल चौगुले एस. एस. सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.