प्रेस मीडिया लाईव्ह :
नवी दिल्ली :
स्वयंघोषित आसाराम बापू यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आसाराम बापूला अंतरिम जामीन मिळाला आहे. 2013 च्या बलात्कार प्रकरणात वैद्यकीय कारणास्तव स्वयंघोषित धर्मगुरू आसारा बापूला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला.
सुप्रीम कोर्टाने आसारामला हृदय उपचाराच्या अटींसह अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आसाराम आपल्याच गुरुकुलातील विद्यार्थिनीसोबत लैंगिक गैरवर्तन केल्याप्रकरणी शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्याला केवळ वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. आसारामला जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून भगत की कोठी येथील हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.