बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

 बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला आता डिस्चार्ज मिळाला आहे. राहत्या घरात चाकुहल्ला झाल्यानंतर त्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.गेल्या पाच दिवासंपासून त्याच्यावर उपचार चालू होते. अखेर सहाव्या दिवशी त्याच्या प्रकृतीचा अभ्यास करून डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला आहे. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला असला तो सध्यातरी तीन गोष्टींना मुकणार आहे. तसेच त्याला डॉक्टरांचा एक महत्त्वाच्या सल्ल्याचे पालन करावे लागणार आहे.

गेल्या पाच दिवसांपासून सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार चालू होते. या रुग्णालयात त्याच्यावर वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यानंतर आता सहाव्या दिवशी त्याला रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो निळी जिन्स आणि पांढऱ्या शर्टमध्ये आला. त्याच्यावर चाकूचे एकूण सहा वार करण्यात आले होते. मात्र या जखमांना न जुमानतो तो रुग्णालयाच्या बाहेर एखाद्या हिरोप्रमाणे आला. त्यानंतर लगेच त्याच्या खासगी कारमध्ये बसून तो त्याच्या राहत्या घरी गेला.

Post a Comment

Previous Post Next Post