प्रेस मीडिया लाईव्ह :
धनंजय हलकर :
मिरज - हिंदू मुस्लीम ऐक्याचा प्रतीक असणारा चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ़ हजरत खाजा शमनामीरा यांना अर्पण करण्यात आला आहे.चर्मकार समाजाच्या गलेफ नंतर खऱ्या अर्थाने उरसास प्रारंभ होतो.दर साल प्रमाणे सातपुते वाडा येतून पहाटे सुरवात होते आणि सूर्योदय होण्या पूर्वी गलेफ अर्पण होतो..
चर्मकार समाजाचा गलेफ झाल्यानंतर तहसील आणि पोलीस प्रशासनाचा अर्पण केला जातो,चर्मकार समाजाची गलेफची 650 वर्षे अविरतपणे सेवा सुरू आहे.या दिवशी अनेक राज्यातून चर्मकार बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात.
Tags
मिरज