गव्हाण येथे सिडकोच्या कारवाईला शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी केला विरोध

 


प्रेस मीडिया लाईव्ह  :

विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

उरण : सिडकोने शहरे वसवली परंतु गावठाणा मधील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली वाढीव बांधकामे यांचा कायम करण्यासंदर्भात निर्णय सिडकोने घेतलेला नाही. सिडकोच्या माध्यमातून ही बांधकामे तोडण्यासाठी नियमाच्या विरुद्ध अनेक वेळा कार्यवाही केली जाते. 17 जानेवारी रोजी अशाच प्रकारे गव्हाण ग्रामपंचायत विभागात सिडकोने कार्यवाही केली. त्याची माहिती मिळताच शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी सिडको प्रशासनाविरुद्ध नागरिकांच्या बाजूने रस्त्यावर उतरत त्या कारवाईला विरोध केला आणि थांबवण्यास भाग पाडले. प्रीतम म्हात्रे यांनी पोकलेनवर चढत या कारवाईला विरोध केला. वाढीव बांधकाम नियमानुसार परवानगी देऊन कायम करण्यासाठी लवकरच बैठक बोलवून निर्णय घेण्यात येईल. स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष म्हणून नेहमी सोबत आहे. 

              शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी घेतलेल्या तीव्र आंदोलनाच्या भूमिकेमुळे गव्हाण येथे तोडक कारवाई साठी आलेल्या सिडकोच्या पथकाला माघारी फिरावे लागले. उलवे नोड परिसरातील गव्हाण गावात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी बांधलेल्या बांधकामांवर शुक्रवारी सिडकोच्या अतिक्रमण विभाग पोलीस फौजफाट्यासह कारवाईचा बडगा उचलण्यासाठी गव्हाण गावात पोहचले होते. याची माहिती प्रितम म्हात्रे याना मिळताच ते प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसोबत गव्हाण गावात पोहचले आणि सिडकोने सुरू केलेली तोडक कारवाई थांबवली. सिडको जो पर्यत्त तोडक कारवाई थांबवत नाही तो पर्यत्त आम्ही इथून हलणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला होता. 

     या कारवाईला विरोध करण्यासाठी शेकाप नेते प्रितम म्हात्रे यांच्यासोबत माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी. उपसरपंच श्री. सचिन घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, शेकापचे तालुका चिटणीस राजेश केणी, शेखर शेळके श्री. राजेश केणी, श्री. जितेंद्र म्हात्रे, श्री. अरुणशेठ भगत, श्री. रोशन घरत, श्री. हेमंत पाटील, श्री. सचिन येरुंकर, श्री. राकेश घरत, श्री. रुपेश मोहिते व ग्रामस्त उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post