चंदनाचे झाड कापून चोरी केल्या प्रकरणी दोघां परप्रांतिय चोरट्यांना अटक.एक अल्पवयीन मुलाचा समावेश.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने चंदनाच् या झाडाची चोरी केल्या प्रकरणी आरोपी करण उर्फ समुसलाल सरायलाल पवार उर्फ पारधी (वय 55) आणि रुलबाबू सरायलाल पवार उर्फ पारधी (वय 20.दोघे रा.हरदुवा जि. कटणी राज्य मध्यप्रदेश) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

क.बावडा परिसरातील जिल्हा न्यायालयात कृष्णा इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या वीस हजार रुपये किमंतीच्या चंदनाचे झाड कापून चोरून नेल्याची फिर्याद जिल्हा न्यायालयातील शिपाई चेतन जाधव यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात दिली होती.हा प्रकार दि.20/01/2025 ते 21/01/2025 या कालावधीत घडला होता.

वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला या गुन्हयांचा  तपास करून गुन्हयां उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.सदर गुन्हयांचा तपास करीत असताना हा गुन्हा मध्यप्रदेश येथील करण पवार यांने आपल्या साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती मिळाली असून ते कर्नाटकातील रायबाग येथे असल्याची माहिती.मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रायबाग येथे जाऊन नमूद आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवा उडवी केली.त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हयां केल्याची कबुली दिली.आरोपींनी चोरुन कापून नेलेल्या चंदनाच्या झाडाची त्यांनी कुणाला तरी विक्री केल्याची माहिती मिळाली  असून त्याचा तपास चालू आहेत.पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह दोघां आरोपींना पुढ़ील तपासासाठी शाहुपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे,अतिश म्हेत्रे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post