प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - 3 लाखांची खंडणी उकळल्या प्रकरणी तोतया पत्रकार अन्सार रफिक मुल्ला (वय 43.रा.बोंद्रेनगर ,कोल्हापुर) याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
लक्ष्मीपुरी येथील प्लास्टिक वस्तु व्यावसायिकाला धमकी देऊन 3 लाखांची खंडणी उकळणारयात त्याचा समावेश होता.सोमवारी त्याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली होती.गुन्हा घडल्या पासून तो पसार झाला होता.त्याने जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फ़ेटाळल्यामुळे तो स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला होता.या प्रकरणात एकूण 16 संशयीत असून आता पर्यत 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.