मोतीनगर येथील गावठी दारुअड्डे उध्वस्त करून एक लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त. राजारामपुरी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क यांची संयुक्त कारवाई.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

   कोल्हापूर  - राजारामपुरी पोलिसांना मोतीनगर येथे गावठी दारूची निर्मिती मोठया प्रमाणात चालू  असल्याची माहिती मिळाली  होती. त्यानुसार राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस  निरीक्षक सुशांत चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी पथकासह बुधवारी सकाळी मोतीनगरातील गावठी अड्डे उध्वस्त केले. यावेळी १ लाख १० हजार रुपयांचे रसायन नष्ट केले.

  या प्रकरणी जेवर कदम बागडी (वय ६६), संतोष किरण बाटुंगे (वय २६) व काजल अनिल मच्छले (वय ४० रा. तिघे मोतीनगर, कंजारभाट वसाहत, कोल्हापूर) तिघांच्यावर  गुन्हे दाखल केले आहेत.

   गेल्या आठवडयात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोतीनगर परिसरात गावठी दारू अडड्डयावर कारवाई केली होती. यावेळी पथकाला तेथील नागरीकांनी विरोध केला. दुय्यम निरीक्षक व एका जवानावर हल्ला करून त्यास जखमी केले होते. या प्रकरणी पोलीसांनी चौघांना अटक केली होती.

   बुधवारी सकाळी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण व त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक दत्तात्रय भोजणे, सहायक फौजदार रशिद शेख, अरविंद पाटील, सचिन देसाई, महेश कुंभार, प्रविण आवडे, अनिल चव्हाण, महिला हेड कॉन्स्टेबल मिनाक्षी पाटील,सुप्रिया कचरे, नितीन मेश्राम, नितीश बागडी, नितीन कुऱ्हाडे, विकास चव्हाण, श्रृती कांबळे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

  तयार दारू, दारूसाठी जमीनीत पूरुण ठेवलेले रसायन,नवसागर, काळा गुळ असे १ लाख १० हजार रुपयांचे साहित्य या पथकाने नष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post