प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - सीपीआर आवारातील असलेल्या टपऱ्यांवर कुणाची एवढी मर्जी आहे.संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी खडेबोल सुनावून सुध्दा त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात आहे.गेल्या काही महिन्या पासून सीपीआर मधील काही भागांची दुरुस्ती चालू आहे.त्यामुळे सीपीआरचे सौदर्यांत भर पडत आहे.पण येथील अस्ताव्यस्त पार्किग ,येथे असलेल्या काही टपरयां.या टपऱ्यांच्या समोर लावलेल्या वाहनामुळे एखादी येणारी रुग्णवाहिका व शववाहिका गाडीला होत असलेला अडथळा या बाबत काहीनी तक्रार करून सुध्दा कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
संबंधित विभाग या अतिक्रमण केलेल्या खोक्यांची वरती कारवाई करण्यास का धजत नाही.याची चौकशी आरोग्यमंत्री यात लक्ष घालून सीपीआर मोकळा श्वास घेईल का अशी रुग्णाच्या नातेवाईकांच्यातुन विचारणा होत आहे.गेल्या काही वर्षापासून टपरीधारकांनी ठाण मांडून बसले आहेत.या टपरयांच्या संख्येत वाढ होत चालली आहे.ह्या कुणाच्या मर्जीने चालत आहेत.याची चौकशी होणे आवश्यक आहे.या टपरयांच्या वरती एवढी मर्जी कशासाठी यांना कुणाचे पाठबळ मिळत आहे.संबंधित विभाग कुणाच्या दबावाला बळी पडून त्यांना पाठबळ देत आहे.याची चौकशी करून सीपीआर आवारातील सुप्रिया काढ़ाव्यात अशी मागणी होत आहे.त्याच प्रमाणे सीपीआर आवारातील टपरयांनी अतिक्रमण करून उभ्या केल्या असून काहीनी विद्युत जोडण्या केल्याचे दिसून येते त्यामुळे या ठिकाणी कुणाच्या मेहरबानीने विद्युत जोडणी केली आणि पाण्याचा वापर कुठून होतो यांची चौकशी होणे आवश्यक आहे.
त्याच प्रमाणे सीपीआर मधील काही घटक रुग्णाना बाहेरुन रक्त ,लघवी तपासणी करून घेण्याचा सल्ला देत असल्याचा प्रकार स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने उघडकीस आणला .आणि कशा कशाच्या तपासण्या बाहेरुन करून घेण्याचा सल्ला देत आहेत याची चौकशी होणे गरजेचे आहे.अशी एखादी साखळी असण्याची शक्यता आहे.त्याचा भांडाफोड करून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.सीपीआर रुग्णालयात हे गोरगरीब जनतेचं रुग्णालयात आहे.येथे कोल्हापुर जिल्हयासह इतर जिल्हयातुन त्याच प्रमाणे बाहेरील राज्यातुन उपचारासाठी रुग्ण येत असतात.पण या सीपीआर मधील काही घटक रुग्णांना रक्त,लघवी संबंधि व इतर तपासण्या होत नसल्याचे सांगितले जात आहे.यात काही डॉक्टरांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे.सीपीआर मध्ये डॉक्टरांच्या संगणमताने जर रुग्णांची फसवणूक केली जात असेल तर संबंधित डॉक्टरवर कडक कारवाई करुन त्या डॉक्टराची डॉक्टरकी रद्द करण्याची मागणी केली जात आहे.या सीपीआर रुग्णालयात चाललेल्या बेकायदेशीर कारभारात आरोग्यमंत्री लक्ष घालतील का ?