प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-क.बावडा येथील पांडुरंग रामा उलपे यांना सोमवार (दि.16) रोजी हृदयविकाराचा झटका आला होता.त्यांच्यावर कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते.गुरुवार (दि.02) रोजी उपचार चालू असताना मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.त्यांच्या नातेवाईकांनी एका रुग्णवाहिकेतुन मृतदेह नेत असताना रुग्णवाहिका एका खड्डयात गेल्यामुळे पुन्हा त्या मृत झालेल्या व्यक्तीची हालचाल चालू झाली.काही दिवसांनी दवाखान्यात उपचार घेऊन नवीन वर्षाच्या सुरुवातीस बरे होऊन घरी आले.
ते दहाव्या वर्षा पासून वारकरी झाले होते.त्यांना पांडूरंग पावल्याने घरी परतल्याचे नातेवाईकांनी माहिती दिली.सोमवार (दि.30) रोजी रुग्णालयातुन डिसचार्ज मिळाला असता त्यांच्या नातेवाईकांनी फुलांच्या पायघड्या घालून औंक्षण करण्यात आले.ते मृत्युच्या दारातुन परत आले आणि त्यांचा पुनर्जन्म झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी, मित्रपरिवार आणि वारकरी संप्रदायातील व्यक्तीनी त्यांची विचारपूस केली.
पांडूरंग उलपे हे पत्नीसह उलपेमळा येथे रहात होते.ते शेती करीत असून त्यांच्या मुलीचे लग्न झाले आहे.16 डिसेबर रोजी नामस्मरण करीत असताना अचानक बसलेल्या जागी खाली कोसळल्याने त्याचा आवाज आला.कसला आवाज आला म्हणून त्यांची पत्नी पहाण्यास गेल्या असता पांडूतात्या निपचित पडल्याने त्यानी आरडा ओरडा करून त्या परिसरातील लोकांना बोलावून त्यांना उपचारासाठी क.बावडा आणि गंगावेश येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्रकृती फारच गंभीर झाली.शेवटी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.ही बातमी ते रहात असलेल्या परिसरातील लोकांना समजताच अंत्यविधीची तयारी सुरू केली.पत्नी बाळाबाई आणि त्यांच्या नातेवाईकांनी आक्रोश करू लागले.त्यांच्या नातेवाईकासह ग्रामस्थांनी अत्यंसंस्कारासाठी गर्दी केली होती.मात्र पांडूतात्यांच्या जगण्याच्या प्रबळ इच्छाशक्ती पुढ़े आणि डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नातुन त्यांच्या प्रकृतीत हळू हळू सुधारणा होऊ लागली.आता ते ठणठणीत आहेत.