कोल्हापुरात राज्य उत्पादनच्या पथकावर हल्ला , दुय्यम निरीक्षकासह कॉन्स्टेबल जखमी : चौघांना अटक.

 या घडलेल्या घटनेने राज्य उत्पादन शुल्कचे वरिष्ठ अधिकारी यांनी सीपीआर येथे भेट देऊन जखमीची  विचारपूस करत माहिती घेतली.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर - मोतीनगर येथे कंजारभाट वसाहत परिसरात चालू असलेले हातभट्टी दारूचे अड्डे उध्वस्त करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादनच्या पथकावर हातभट्टी चालवणाऱ्या कुटुंबियांनी हल्ला केला. यात महिला दुय्यम निरीक्षक व कॉन्स्टेबल जवान जखमी झाले. सोमवारी (दि.20) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारासह हा प्रकार घडला. या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून यात  चौघांना अटक केली आहे. राज्य उत्पादनचे जवान राहुल गुरव यांनी फिर्याद दिली आहे.

   विजय कांती अभयगे (वय ४२), रिया विजय अभंगे (वय १९),रेखा विजय अभंगे (वय ३७), नितू गणेश पाटील (वय ४५ रा. सर्व मोतीनगर, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संशयीतांनी केलेल्या हल्यात राज्य उत्पादनच्या दुय्यम निरीक्षक कोमल यादव व जवान राहुल सदाशिव गुरव (वय ३८) हे दोघे जखमी झाले.

    राज्य सरकारचा महसुल चुकवण्यासाठी मोतीनगर,कांजारभाट वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार करून विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला समजली मिळाली होती. अधीक्षक स्नेहलता नरवणे यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादनचे पाच निरीक्षक व १५ ते २० कर्मचारी यांच्यासह  पाच गाडया करून कारवाईसाठी सोमवारी दुपारी गेले होते.

   यावेळी कारवाईला विरोध करण्यासाठी तेथील लोकांनी  दंगा घातला.  काही महिला व तरुणी या पथकाच्या अंगावर धाऊन गेले. त्यामुळे पथकही घाबरले. यावेळी झालेल्या हल्लयात राज्य उत्पादनचे दोघेजण जखमी झाले. पथकाला कारवाईस विरोध होत असल्याचे लक्षात आल्यानंतर हे पथक तेथून निघून आले. त्यानंतर त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्या चौघांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलीसांनी संशयीत हल्लेखोरांना अटक केली आहे.

 कारवाई करण्यास आलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांनी आमच्या अंगावर हात उगारला. त्यामुळे आमची कपडे फाटली असा कांगावा संशयीत महिलांनी केला. त्यामुळे कारवाईस गेलेले पथक गांगरून गेले. आपल्या विरोधात संशयीत महिला पोलीसात तक्रार देतील या भितीने त्यांनी याबाबत पोलीसांशी संपर्क साधून घडलेलया घटनेची माहिती दिली.

Post a Comment

Previous Post Next Post