प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने प्रतिभानगर येथे बंद घराच्या खिडकीचे गज कापून घरफोडी करणारा चोरटा अभिजीत विकास कांबळे (वय 27.रा.माधवनगर ,कणेरीवाडी ता.करवीर ) याला अटक केली आहे.वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या घरफोडीच्या गुन्हयांचा तपास करून उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
प्रतिभानगर येथील श्री.दिलीप गोपाळ कदम (रा.लक्ष्मीशंकर बंगला ,स्टेट बँक कॉलनी,को.) यांचा दोन वर्षांपूर्वी दि.06/04/2022 रोजी त्यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करून TCL कंपनीचा 43"एलईडी टिव्ही.आणि दोन घरगुती सिंलेडरच्या टाक्या चोरून नेले बाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हयांची दाखल आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तपास पथके तयार करून या अनुशंगाने माहिती घेऊन तपास करीत असताना या पथकातील पोलिसांना दोन वर्षांपूर्वी प्रतिभानगर येथे झालेली घरफोडी कणेरीवाडी येथील परिसरात असलेल्या माधवनगर येथे रहात असलेला अभिजीत कांबळे आणि त्याच्या साथीदाराने केली असून चोरलेला टिव्ही आणि सिंलेडरच्या टाक्या घरात लपवून ठेवल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून अभिजीत कांबळे याला ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घराच्या लॉप्टवर ठेवलेला TCL कंपनीचा 43"टिव्ही.आणि सिंलेडरच्या दोन रिकाम्या टाक्या असा एकूण 31हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल मिळून आला.या बाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपला साथीदार राहुल देवकर (रा.बत्तीसशिराळा ,जि.सांगली) यांच्या मदतीने प्रतिभानगर येथे बंद घराच्या खिडकीचे गज कापून चोरी केल्याची कबुली दिली.राजारामपुरी पोलिस ठाण्यात चोरीस गेलेल्या मालाची नोंद असलेल्या मालाची खात्री करून तो मुद्देमाल जप्त करून पुढ़ील तपासासाठी अभिजीत कांबळे याला राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.