प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - ताराबाई पार्क येथील टेलीफोन ऑफिसात 15 आयडल केबल वायरची चोरी केल्या प्रकरणी त्याच ऑफिसात काम करीत असलेले कामगार रोहित संजय देशपांडे (वय 34.रा.कोडणी ,ता. चिकोडी) आणि प्रणव सुभाष पोवार (वय 28.रा.कोगील खुर्द्द,ता.करवीर ) या दोघांना अटक करून साडेतीन लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताराबाई पार्क येथील भारत संचार निगम या ऑफिसात दि.29/11/2024 ते दि.16/12/2024 या कालावधीत 15 आयडल केबल वायरची चोरी झाली होती.याची फिर्याद मीना रामचंद्र कागीनकर (वय 54.रा.साळोखेनगर ,कंळबा ) यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात दिल्याने शाहुपूरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.सदर गुन्हयांचा तपास शाहुपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी डी.बी.पथकास गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.या अनुशंगाने तपास करीत असताना ही चोरी त्या ऑफिसात काम करीत असलेल्या रोहित आणि प्रणव यांनी केल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली.त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हयांची कबुली देऊन आम्ही हा चोरलेला माल वेळोवेळी सदर बाजार येथील जमीर अकबर पटवेगार या भंगार व्यावसायिकाला विकल्याची माहिती दिली.पोलिसांनी जमीर पटवेगार याच्या दुकानाची झडती घेतली असता तेथे तांब्याची वायर असलेली पोती सापडली.या बाबत चौकशी केली असता त्यांनी या दोघांच्या कडुन वायर विकत घेऊन ती जाळुन तांब्याची तार पोत्यात भरुन ठेवल्याचे सांगितले.त्या प्रमाणे पोलिसांनी 300/किलो.तांब्याची तार.एक किलो 1200/रु.प्रमाणे असा एकूण साडेतीन लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.या गुन्हयांचा पुढ़ील तपास सहा.फौजदार संदिप जाधव करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या पथकाने केली.